पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बाणेर येथील ई-बस डेपो आणि ई-बसेसचे लोकार्पण आज (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहे. त्यानंतर 70 ई-बसेसचे संचलन 6 मार्चपासूनच सुरू होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेंतर्गत पीएमपीकडे 500 ई-बसेस उपलब्ध होणार आहे. सध्या 143 ई-बसेसची नोंदणी पूर्ण झाली असून, त्यापैकी 70 बसेस बसेसचे संचलन सुरू होणार आहे. तर, बाणेर येथील ई-बस डेपो ईव्हीईवाय ट्रान्स प्रा. लि. (ओलेक्ट्रा, हैद्राबाद) या कंपनीने विकसित केला आहे. याठिकाणी बसेसच्या चार्जिंगसाठी 35 चार्जर बसविण्यात आले आहेत. या डेपोतून 14 विविध मार्गांचे नियोजन करण्यात आले असून, सुरूवारील 5 मार्गांवर 30 शेड्युलद्वारे संचलन सुरू होणार आहे. त्यामुळे आता रविवारपासून संचलनातील ई-बसेसची संख्या वाढणार आहे.