नवी दिल्ली – मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे देशभर संतापाची लाट सुरु असताना आता पश्चिम बंगालमध्ये महिलांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील मालदाच्या बामंगोला पोलीस स्टेशन हद्दीतील पकुहाट परिसरात दोन आदिवासी महिलांना नग्नावस्थेत आणि निर्दयीपणे बुटांनी मारहाण करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मणिपूरप्रमाणे या प्रसंगाचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही घटना १९ जुलैची आहे. काही महिला दोन महिलांना बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, पोलिसांकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतरच या घटनेची माहिती मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोन महिलांना चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांना स्थानिक महिला आणि दुकानदारांनी बेदम मारहाण केली. महिला चोरी करताना पकडल्या गेल्या. भीतीपोटी त्यांनी तक्रारही नोंदवली नाही, असे सांगण्यात येत आहे.
The horror continues in West Bengal. Two Tribal women were stripped naked, tortured and beaten mercilessly, while police remained a mute spectator in Pakua Hat area of Bamangola Police Station, Malda.
The horrific incident took place on the morning of 19th July. The women… pic.twitter.com/tyve54vMmg
— Amit Malviya (@amitmalviya) July 22, 2023
यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पश्चिम बंगालमधील सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.या घटनेवरून आता राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी बंगालमधील हावडा येथील पंचला पोलीस स्टेशन परिसरातही अशीच घटना समोर आली होती. पंचायत निवडणुकीत एका महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर छेडछाडीचा आरोप केला होता. ज्यामुळे पश्चिम बंगालमधील वातवरण चांगलेच तापले होते.