पुणे : “वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ’ अर्थात “नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस’ने घेतलेल्या अस्थिरोग शाखेच्या पदव्युत्तर परीक्षेत संपूर्ण देशात पुण्यातील डॉ. अमेय कटारिया सर्वप्रथम आले. त्यांना प्रतिष्ठेचा डॉ. बालू शंकरन सुवर्णपदक जाहीर झाला आहे. हे सुवर्णपदक 20 जून 2022 रोजी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे होणाऱ्या 21 व्या पदवीदान समारंभात प्रदान केले जाईल.
डिप्लोमा इन ऑर्थोपेडीक्स (डी.ऑर्थ) या पदविका परीक्षेतही ते संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम येवून त्यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले होते. डॉ. अमेय कटारिया हे अजित आणि मेधा कटारिया यांचे सुपुत्र असून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांचे जावई तसेच थोर समाजवादी नेते भाई वैद्य यांचे नातजावई आहेत.