राम गोपाल वर्माचा “मर्डर’ वादात

राम गोपाल वर्मा हे कधी आपल्या वक्तव्य किंवा चित्रपटांमुळे चर्चेत येत असतात. सध्या लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीतील काम थांबले असेल, पण आरजीव्हीने एकामागून एक चित्रपटांची निर्मिती करत ते ऑनलाइन प्रदर्शित केले आहेत. नुकतीच त्यांची “मर्डर’ वेब चित्रपटाची घोषणा केली आहे. मात्र, हा चित्रपट वादात सापडला आहे.

राम गोपाल वर्मा यांनी “क्‍लाइमॅक्‍स’ ते “नेकेड’पर्यंत अनेक बोल्ड चित्रपट तयार केलेले आहेत. आता त्यांनी “मर्डर’ चित्रपटाची घोषणा केली असून तो प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत अडकला आहे.
यामुळे त्यांना सोशल मीडियावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हा चित्रपट 2018 मध्ये तेलंगणात होरपळून मारल्या गेलेल्या एका घटनेवर आधारित आहे. आता बातमी अशी आहे की विक्‍टिमच्या वडिलांनी कोर्टात हा विषय प्रलंबित असल्याचे सांगितले.

या तक्रारीवरून रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात तेलंगणातील मिर्यालागुडा टाऊनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांचे वकील दाखल केलेल्या खटल्याला कायदेशीर उत्तर देतील.तसेच हा सार्वजनिक विषयातील एखाद्या विषयावरील चित्रपट आहे. हे केवळ क्रिएटिव्ह वर्क असून एखाद्याच्या

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.