पारनेर (प्रतिनिधी) – जूनअखेर सेवक संच निश्चिती होऊन शिक्षकेतर सेवकांची भरती होइल, असे आश्वासित करत शिक्षकेतर सेवकांच्या प्रश्नांसह कंत्राटीकरण, जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर भरती, आश्वसित प्रगती योजना या प्रलंबित प्रश्नावर भविष्यात लढा उभारावा लागेल. त्यासाठी सर्वांनी संघटनेच्या पाठीशी ताकतीनिशी उभे रहावे, असे आवाहन शिवाजीराव खांडेकर यांनी केले
पारनेर तालुका शिक्षकेतर संघटना व जिल्हा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दि.१३ एप्रिल रोजी शिक्षकेतर सेवकांचे चर्चासत्र व शिक्षकेतर सेवकांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आश्वसित प्रगती योजना, संच निश्चिती व शिक्षकेतर कर्मचारी पद भरती असे अनेक प्रश्न शासन स्तरावरून मार्गी लावून शासन निर्णय झाला. त्याबददल, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांचा सत्कार समारंभ पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी भाऊसाहेब थोटे, जिल्हा सचिव भानुदास दळवी, विनोद गोरे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष प्रदिप गोसावी, पारनेर तालुका सचिव संतोष खोडदे, रंगनाथ दाते, पञकार शशिकांत भालेकर,
मारुती जोरी, संभाजी बेलोटे, योगेश भालेकर,भरत उचाळे, बापू दुधाडे, अरुण पठारे, मिरा पुजारी, ज्योती साळे, संभाजी थोरात यांनी चर्चासत्राचे यशस्वीपणे नियोजन केले. सूत्रसंचालन मिरा पुजारी यांनी केले, भोगाडे यांनी आभार मानले.