पुणे – पुणे शहर शिक्षणाची आणि संस्कृतीची राजधानी. पुण्यात अनेक मोठे उद्योग उभे राहिले. त्यानंतर पुणे शहरातील रोजगार वाढला. पुणे शहरातील वातावरण, मुंबईचा असणार निकटचा संबंध, देशपातळीवर जाण्यासाठी असलेल्या वाहतुकीच्या सेवा यामुळे उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी या शहराला प्राधान्य दिले. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर माहिती आणि तंत्रज्ञानाची नगरी म्हणजे “आयटी हब’ म्हणून उदयास आली आहे. या आयटी हबमुळे देशाने सॉफ्टवेअर निर्यातीतून परकीय चलन मिळवले असून देशाची सॉफ्टवेअर निर्यात 2023 मध्ये 8.3% ने वाढली. यामध्ये पुणे शहरातील कंपन्यांचा वाटाही महत्त्वाचा असल्याचे केंद्राच्या आयात-निर्यात अहवालात म्हटले आहे.
पुणे शहरातील आयटी कंपन्या
अग्रगण्य इन्फोसिस कंपनी…
पुणे शहरात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या आहेत. परंतु, यामध्ये इन्फोसिस (खपषीूीे ङींव) या कंपनीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सात अभियंत्यांनी मिळून दि. 2 जुलै 1981 मध्ये पुणे शहरात या कंपनीची स्थापना केली. ऑगस्ट 2021 मध्ये इन्फोसिस 100 बिलियन डॉलरची कंपनी झाली. सध्या कंपनीचे मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे. सर्वाधिक मूल्यांकन असलेली ही देशातील चौथी कंपनी आहे.
पुण्यात टेक महिंद्राचे मुख्यालय…
1986 मध्ये स्थापन झालेल्या टेक महिंद्रा कंपनी देशातील मोठी कंपनी आहे. या आयटी कंपनीचे मुख्यालय पुणे शहरात आहे. या कंपनीच्या शाखा भारतासह, अमेरिका, इंग्लडमध्ये आहेत. कंपनी सॉफ्टवेअरसह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.
टीसीएस लिमिटेड कंपनी…
टीसीएस ही आटी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीच्या 46 देशांत शाखा आहेत. 1968 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. त्यावेळी कंपनीचे नाव टाटा कंप्युटर सिस्टम्स होते. 2004 मध्ये या कंपनीची नोंदणी शेअर बाजारात झाली. जागतिक पातळीवर दिग्गज कंपनी म्हणून टीसीएसची ओळख आहे. पुणे शहरात या कंपनीची शाखा आहे.
एल ऍन्ड टी टेक्नो. सर्व्हिस लि.
भारत इंजिनिअरमधील अग्रण्य असलेली एल अँड टी कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर आहे. एल ऍन्ड टी टेक्नोलॉजी सर्व्हिस लिमिटेड नावाने असलेली ही कंपनी पुणे शहरात आहे. सॉफ्टवेअर निर्मितीबरोबर, इंजिनिअरिंग एनालिटिक्स, मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.