सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आणखी २० जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ६६९ वर पोहचली आहे. मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध करोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये कराड तालुका – १२, वाई तालुका – ३, सातारा तालुका – ३, जावली तालुका – १, फलटण तालुका – १ अशा एकूण २० जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील तांबवे येथील २५ वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील ओझरे येथील ७५ वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील तुळसण येथील २७, ६०, ५१ वर्षीय पुरुष, २८, ४० वर्षीय महिला, केसे येथील ५०, ४२, ६४, २० व ६० वर्षीय महिला, २० वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील ४२ वर्षीय महिला. वाई तालुक्यातील वेरुळी येथील ४६ वर्षीय पुरुष, ११ वर्षीय मुलगा , २६ वर्षीय महिला. सातारा तालुक्यातील कुसवडे येथील १९ व ४७ वर्षीय महिला, देगांव येथील ५५ वर्षीय पुरुष अशा २० जणांचा समावेश आहे.