- 265 बाधित
- 27 करोनाबाधितांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. आज शहरात नवीन 265 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर तब्बल 1896 जण करोनामुक्त झाले आहेत. तर 27 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी (दि. 4) शहरात 265 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 51 हजार 743 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 27 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 17 व शहराबाहेरील 10 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 6194 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 1896 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 576 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 7488 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 2096 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 936 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या आता 3032 इतकी उरली आहे.
जिल्हा रुग्णालयात सहा बाधित; एकाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 4) 6 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नारायणगाव, वाकड, मुळशी, औंध येथील रुग्णांचा करोनाबाधितांमध्ये समावेश आहे. त्यामध्ये 3 पुरुष रुग्णांसह 2 मुले आणि एक महिला रुग्ण आहे. रुग्णालयात 6 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये 3 महिला आणि 3 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. हिंजवडी, वडगाव मावळ, सांगवी, पिंपळेनिलख, मालठण (ता. शिरूर), नवी सांगवी येथील हे रुग्ण आहेत. रुग्णालयात सध्या 25 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 347 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 57 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.