निवादी – मध्यप्रदेशात निवादी जिल्ह्यात बुधवारी एका बंद पडलेल्या कुपनलिकेत पाच वर्षाचा मुलगा खेळताखेळता पडल्याचे वृत्त आहे. त्याला बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न जारी आहेत. हा मुलगा त्या कुपनलिकेतील भोकात दोनशे फुट खाली जाऊन अडकला आहे.
बऱ्हाहबुजुर्ग गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.मध्यंतरी देशाच्या अनेक भागात असे प्रकार घडत असत परंतु ते अलिकडे थांबले होते, पण पुन्हा त्याची या गावात पुनरावृत्ती झाली आहे.या कुपनलिकेत शंभर फुटाच्या खाली पाणी आहे त्यामुळे हा मुलगा पाण्यात अडकला आहे किंवा कसे हे मात्र समजू शकलेले नाही. ही कुपनलिका अलिकडेच खोदण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तज्ज्ञांच्या मदतीने तेथे बचाव यंत्रणा पाठवली आहे.