कोपरगाव (प्रतिनिधी): करोनाचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाने लॉकडाउनच्या काळात दारुचे सर्व दुकाने बंद ठेवल्याने अनेक मद्यपींची दारुविना घालमेल झाली. दोन महीने दारूच्या प्रतिक्षेत असलेल्या मद्यप्रेमींसाठी प्रशासनाने दिलासा देत गुरूवारी सकाळी सर्व वाईन शॉप व बिअरबार विक्रीसाठी खुले केले.
कोपरगाव शहरातील दारूचे दुकाने चालु झाल्यानंतर मद्यपींची मोठी गर्दी होईल असा अंदाज प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह दुकानदार व नागरीकांना होता. मात्र सकाळी काही वेळासाठी किरकोळ गर्दी झाली मात्र दुपारी १२ वाजल्या नंतर शहरातील सर्वच दुकानावर शुकशुकाट दिसुन आला. वाईनशॉपवर मद्य खरेदीसाठी गर्दी होणार, कोण कोण रतीमहारती लाईनमध्ये उभे राहून मद्य खरेदी करणार हे पहाण्यासाठी काही होशी नागरीक कोपरऱ्यात बसुन मजा पहाण्यासाठी आले होते. पण त्यांच्याही आनंदावर विरझन पडले. मद्यविक्री करणाऱ्यांचा संपुर्ण हिरमोड झाला. गर्दी होणार म्हणुन दुकानासमोर योग्य सुरक्षा व्यवस्था केली होती. बॅरीकेटींग करून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती पण काही वेळातच सर्व काही शांत दिसले. गेल्या दोन महीण्याच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर ही तळीरामांनी कोपरगावमध्ये वाईनशॉपकडे फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान काही मद्यपींनी स्वतः वाईनशॉपवर जावून मद्य खरेदी करण्या ऐवजी मित्र,नोकरा मार्फत खरेदी करण्याचा फंडा वापरला. मोठ्या आकाराच्या बाटल्या घेण्याला त्यांनी प्राधान्य दिले. काहींनी बऱ्याच दिवसानी हातात दारुची बाटली मिळताच त्या दुकानाचे व बाटलीचे दर्शन घेत ऋण व्यक्त करून आनंदात बाटल्या पिशवीत घातल्या.
मद्यपींनी गर्दी न केल्याने शहरात तर्कवितर्क लढवले जात आहे. काहींच्या मते नागरीकांकडे लॉकडाउन मुळे पैसे नसल्याने दारु दुकानावर गर्दी झाली नसावी तर काहींच्या यापुढे दररोज अपेक्षीत प्रमाणात दारूंची विक्री होणार आहे. केव्हाही गेले तरी मिळणार आहे मग आजच का खरेदी करावी म्हणून अनेकांनी गर्दीत खरेदी करण्याचे टाळले असावे अशी चर्चा चौका चौकात रंगली आहे.
शाससकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याला मद्य खरेदी करण्यासाठी रांगेत उभे करून मोठे खंबे खरेदी केले. तर काही वर्दीतील कर्मचारी मद्य खरेदी करण्यासाठी दारूच्या दुकानासमोर ऑन ड्युटी ताटकळत उभे राहून बाटल्या खरेदी करण्याचे कर्तव्य चौख बजावले.