चीनमध्ये आता ‘हम दो हमारे तीन’ धोरण; लोकसंख्या वाढीसाठी घेतला निर्णय

बीजिंग : लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी टोकाचे उपाय करणाऱ्या चीनने आता लोकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून चीनमध्ये पुन्हा एकदा ‘हम दो हमारे तीन’ या धोरणाला सुरुवात झाली आहे.

चीनमध्ये तीन मुलांना जन्म देणार्‍या दांपत्यांना अनेक सोयी-सुविधांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशा दाम्पत्यांना विशेष आर्थिक मदतही केली जाणार आहे. चीनमध्ये दीर्घकाळ ‘वन चाईल्ड पॉलिसी’ होती पण या धोरणावर जगातील सर्वत्र टीका केली जात होती. २०१६ मध्ये चीनने या धोरणामध्ये बदल करून ‘टू चाईल्ड पॉलिसी’ अमलात आणली आणि आता त्यातही बदल करून 20 ऑगस्टला घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ‘थ्री चाइल्ड पॉलिसी’ अमलात येणार आहे.

चीनमधील वृद्धांची लोकसंख्या वाढत असल्याने आणि युवकांची संख्या घटत असल्याने चीन सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. या धोरणाप्रमाणे तीन मुलांना जन्म देणाऱ्या दाम्पत्याला कर विषयक कायदे विमा आणि बँकिंग संदर्भात अनेक सुविधांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सध्या चीनमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकसंख्या 26 कोटी आहे. आगामी काळात ही संख्या अधिक वाढण्याचा धोका असल्यानेच लोकसंख्या विषयक धोरणात बदल करावा लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.