ग्वालियर – मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यातील भाजपच्या महिला नेत्यावर असभ्य भाषेत टिपणी केली होती. कमलनाथ यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज कमलनाथ यांनी ज्या महिला नेत्यावर टिपणी केली होती, त्या इमरती देवी यांनाअश्रू अनावर झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इमरती देवी या आज ग्वालियर येथील छिमक येथे एका प्रचारसभेसाठी आल्या होत्या. यावेळी मंचावर भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे हे देखील उपस्थित होते. या प्रचार सभेच्या समारोपावेळी इमरती देवी यांना आश्रू अनावर झाले. याबाबतचा व्हिडीओ एका नामांकित वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.
#WATCH Madhya Pradesh: BJP leader Imarti Devi breaks down in front of party leader Jyotiradtiya Scindia, at a public rally in Chhimak village of Gwalior.
Congress leader and former CM Kamal Nath had referred to her as “item”, at a public event on October 18th. pic.twitter.com/HQig7dzQq7
— ANI (@ANI) October 20, 2020
राहुल गांधींकडूनही कमलनाथांच्या वक्तव्याला विरोध
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील कमलनाथ यांच्या वक्तव्याला विरोध केला. ‘ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून कमलानाथ यांनी ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर केला ती मला अजिबात मान्य नाही,’असं राहुल गांधींनी म्हटलं.
कमलनाथ मागे हटेनात
राहुल गांधी यांनी खडेबोल सुनावल्यानंतर देखील कमलनाथ माफी न मागण्याच्या निर्मयावर ठाम
आहेत. कमलनाथ म्हणाले की, ‘राहुल गांधींनी दिलेली प्रतिक्रिया हे त्यांचं मत आहे. ते वक्तव्य
करताना काय संदर्भ होता याचे मी स्पष्टीकरण दिले आहे. त्यात अजून काही सांगण्याचे कारण
नाही. माझा कोणाचा अपमान करण्याचा हेतूच नव्हता तर मी माफी का मागावी? जर कोणाला
अपमानित झाल्यासारखं वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.’
नक्की काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि डबरा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवार
इमरती देवी यांचा नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून राजकारण
चांगलच तापलं आहे. विधानानंतर कमलनाथ यांच्यावर भाजपासह आता कॉंग्रेसनेतेही टीका
करत असल्याचे समोर आले आहे.