सलमानचे फॅन्स बऱ्याच दिवसांपासून ‘टायगर’ फ्रॅंचायजीच्या पुढच्या सिनेमाची आतूरतेने वाट बघत आहेत. या फ्रॅंचायजीचे पूर्वीचे पहिले दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाले होते. आता निर्मात्यांनी तिसऱ्या भागाच्या तयारीलाही सुरुवात केली आहे.
याही भागात सलमान बरोबर कतरिना कैफ लीड रोलमध्ये दिसणार आहे. मात्र व्हिलन म्हणून इमरान हाश्मी दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा खलनायक साकारण्यासाठी इमरान एकदम फिट आहे, असा निर्मात्यांचा दावा आहे.
या खलनायकाच्या रोलला जबरदस्त ताकदीने साकारण्याची गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे. “टायगर 3′ चे शुटिंग पुढच्या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. इमरान हाश्मी “टी सिरीज’च्या “लुट गये’ या म्युझिक व्हिइडीओ मध्येही दिसणार आहे. यापूर्वी इमरान हाश्मीने टी सिरीजच्या “मै रहू या न रहूं’ या म्युझिक अल्बममध्येही काम केले होते.
या अल्बमला हिंदी म्युझिक ऍवॉर्डमधील सर्व आघाडीचे ऍवॉर्ड मिळाले होते. याशिवाय अमिताभ बच्चन आणि रेहा चक्रवर्तीबरोबर तो ‘चेहरे’मध्येही दिसणार आहे. मात्र इतक्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये त्याची ‘सिरीयल किसर’ ही इमजे कायम राहणार आहे की नाही, हे जाणण्यासाठी “टायगर 3′ ची वाट बघावी लागेल.