-->

आजचे भविष्य ( शनिवार, १३ फेब्रुवारी २०२१)

मेष : नवीन करार व भागिदारीचे प्रस्ताव येतील. निष्णात व्यक्तिंच्या सल्लयाशिवाय कोणतीही कृती करू नका.

वृषभ : खेळत्या भांडवलाची सोय करावी लागेल. नोकरीत जुने हितसंबंध संपून नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मिथुन : कामात मात्र सहकार्यांवर विसंबून राहू नका. घरात वातावरण सलोख्याचे राहील.

कर्क : मोठयांच्या विचित्र वागण्याचा त्रास होण्याची शक्‍यता तरी दुर्लक्ष करा. लक्ष न देता काम चालू ठेवा.

सिंह : सध्या ग्रहांची साथं तुम्हाला लाभेल त्यामुळे प्रगतीपथावर रहाल. व्यवसायात काही कडू गोड अनुभव येतील.

कन्या : पैशाचे नवीन आव्हान पेलावे लागेल. जादा कष्टाची तुमची तयारी असेल. मानसिक समाधान मिळेल.

तूळ : वरिष्ठ महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. जादा सुविधा व अधिकारही देतील.

वृश्‍चिक : घरात प्रियजनांच्या जीवनातील शुभ समारंभ ठरेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

धनु : “प्रयत्नांती परमेश्‍वर’ ही म्हण लक्षात ठेवून त्याप्रमाणे कृती करा. जुनी देणी दयावी लागतील.

मकर : नशिबांवर विसंबून न राहता प्रयत्नात सातत्यता राखा. तरूणांना प्रेमात रूसवे फुगवे सहन करावे लागतील.

कुंभ : व्यवसायात वृद्‌धी करण्यासाठी नवे विचार व योजना मनात घोळतील. परदेश व्यवहारात गती येईल.

मीन : करार करताना घाई नको. नोकरीत थोडे सबुरीचे धोरण ठेवा. पूर्वी केलेल्या मागण्या वरिष्ठ मान्य करतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.