वॉशिंग्टन मानवाचा इतिहास हा सर्व शास्त्रज्ञसाठी एक कुतूहलाचा विषय आहे यावर गेले कित्येक वर्ष संशोधन सुरू आहे. आता या संशोधनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले असून शास्त्रज्ञाने गेल्या एक लाख वर्षांचा इतिहास सांगणारे एक वंशवृक्ष तयार केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या बिग डाटा इन्स्टिट्यूटच्या संशोधकानी हे संशोधन केले असून त्यामुळे मानवी इतिहासावर एक महत्त्वाचा प्रकाश पडणार आहे.
शास्त्रज्ञानी काही पुरातन आणि आधुनिक असे देण्याचे नमुने गोळा केले असून त्या नमुन्याच्या साह्याने आता मानवी उत्क्रांती आणि मानवी इतिहास यावर एक महत्त्वाचा प्रकाश पडण्याची आशा निर्माण झाली आहे. सायन्स नावाच्या जर्नलमध्ये याबाबतचा लेख प्रसिद्ध झाला असून या संशोधनाच्या मदतीने आपले पूर्वज कोण होते याचा शोध आता घेता येणार आहे.
संशोधनाचे प्रमुख यां वांग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या संशोधनाच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध जातीच्या आणि विविध प्रकारच्या मनुष्यांचे जैवतांत्रिक नमुने गोळा करण्यात आले. यांचा अभ्यास केला असता अनेक नमुने एकमेकांशी संबंधित असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जगाच्या एखाद्या कोपर्यात असलेल्या माणसाचा जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या माणसाची संबंध असू शकतो असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.
या संशोधनातून अशा प्रकारचे जे कॉमन डीएनए सापडले त्याचा वापर करून एक वंशवृक्ष किंवा फॅमिली ट्री तयार करण्यात आली ज्या माध्यमातून जगातील सर्वच लोक एकमेकांशी कशाप्रकारे नात्याने जोडले आहेत हे स्पष्ट होणार असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
जगातील सुमारे दोनशे पंधरा लोकसंख्या गटातून 3609 व्यक्तींचे नमुने गोळा करण्यात आले अभ्यासानंतर अनेक नमुने यांचे पूर्वज एकच असल्याचे लक्षात आले या नमुन्याची साखळी जोडत जोडत सुमारे एक लाख वर्षे इतिहासाचे ही फॅमिली ट्री तयार करण्यात आली.