मुंबई – जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. ‘झंजीर’, ‘कोरा कागज’ या त्यांच्या चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र जया बच्चन यांचा राग आणि वागणूक सध्या खूप चर्चेत आहे. जया या अनेकदा चाहत्यांच्या गर्दीवर आणि पापाराझींवर रागावताना दिसतात. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या पुन्हा एकदा फोटोग्राफर्सवर रागवताना दिसत आहे. त्यांच्या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत जया बच्चन यांचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझी त्यांना आवाज देताना दिसतात. तेव्हा जया बच्चन पापाराझींवर ओरडत “मी बहिरी नाही” असं म्हणतात. त्यांची ही कृती पाहून सोशल मीडियावर त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. “जेवढे अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. तितकेच मॅडमला लोक नापसंत करतात”, “एवढा अटिट्युड कसला आहे?”, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी जया बच्चन यांनी खास लूक केला होता. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये त्या दिसून आल्या होत्या. यावेळी अभिषेक बच्चनने देखील हजेरी लावली होती. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. कॉमेडी आणि रोमान्सचा तडकाही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.