इलियाना डिक्रूज सध्या आपल्या “पागलपंती’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने ऑस्ट्रेलियातील फोटोग्राफर आणि बॉयफ्रेंड अँड्य्रू निबोनसोबतच्या ब्रेकअपविषयीच्या चर्चांबाबत मौन सोडले.
यावेळी बोलताना ती म्हणते की, मी आतापर्यंत रियल डेटवर कधीही गेलेले नाही. एखाद्यासोबत फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाणे, कॅंडललाईट डिनर घेणे हा अनुभव खरोखरीच मजेशीर असेल ना!
गंमत म्हणजे, मध्यंतरीच्या काळात या दोघांनी लग्न केल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र, सप्टेंबर महिन्यामध्ये या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले. तसेच अँड्य्रूने काढलेले फोटोग्राफही तिने डिलिट करून टाकले आहेत. सध्या इलियाना “द बिग बुल’ या चित्रपटाचे चित्रीकरणही करत आहे. या चित्रपटात ती अभिषेक बच्चनसोबत झळकणार आहे.
देश-विदेशात कितीही भटकंती करत असली तरी इलियाना आपल्या करिअरबाबत अत्यंत गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिचा बिकिनीतील एक फोटो व्हायरल झाला होता. यानंतर बोलताना ती म्हणाली होती की, याबाबत मी परमेश्वराचे आभार मानते.
कारण त्याच्यामुळेच मला ही फिगर मिळाली आहे आणि या फिगरमुळेच फॅशनशी निगडित नियतकालिकांमध्ये आणि सोशल मीडियावर माझ्या छायाचित्रांना पसंती मिळते आहे!