नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 17 हजारांवर गेली आहे. सध्या देशातील 17 हजार 656 जणांना कोरोनाची लागण झाली असून 559 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2301 रुग्ण बरे झाले आहे. तर आरोग्य मंत्रालयाने सागितलं की, लॉकडाऊनमुळे भारतात कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे.
I normally don’t post personal videos inspite of being trolled often, but had to now. In a time when humanity is faced with a pandemic and race religion colour country are no concern, some Indians are still indulging in #FakeNews #HinduMuslim #HateMongering.
We need love not hate pic.twitter.com/4ckWzUVE4l— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) April 19, 2020
अशातच करोनासोबतच खोट्या बातम्या आणि अफवांना देखील पेव फुटला आहे. सोशल मीडियावर काही युजर्सद्वारे करोनाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. ज्यामुळे देशात हिंसक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात अभिनेता जावेद जाफरीने ट्विट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मंडळींवर संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले जावेद जाफरी ?
“खरं तर मी सोशल मीडियावर माझे पर्सनल व्हिडीओ कधीच शेअर करत नाही. परंतु आज त्याची गरज आहे म्हणून तुमच्या समोर आलोय. सध्या संपूर्ण देश करोनासारख्या प्राणघातक विषाणूच्या विळाख्यात सापडला आहे. परंतु काही लोक खोट्या बातम्या पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जणांनी यासाठी माझ्या नावाचा देखील वापर केला. परंतु या मंडळींनी त्वरीत थांबावं अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावं.” अशा आशयाचा संदेश त्यांनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांना दिला आहे.