मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत येत आहे. यापूर्वी या मालिकेत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच मालिकेतील काही कलाकारांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या बराच वाद निर्माण झाला आहे. मात्र आता या मालिकेत बबीताची भुमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
सध्या मूनमून दत्ता तिच्या आईसोबत दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील काही फोटोमध्ये ती मशिदीच्या बाहेर उभी राहिलेली दिसते. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कोणी काही बोलेले किंवा विचार करेल याआधी मला सांगायचे आहे की, मी हिंदू आहे आणि यावर मला गर्व आहे. मी दुसऱ्या देशात आहेत, तेथील संस्कृती वेगळी आहे. मी त्यांचा आदर केला पाहिजे. त्याच प्रकारे इतर धर्मातील लोकांकडून अपेक्षा करते की त्यांनी देखील माझ्या धर्माचा आणि श्रद्धांचा आदर करावा.’ मात्र तरीही तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
View this post on Instagram
मुनमुनच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘मंदिर कमी आहेत का तू मशीदीत गेली.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हिंदू आहेस तर मंदिरात जा…’ सध्या सोशल मीडियावर मुनमुन दत्ताची पोस्ट व्हायरल होत आहे. दरम्यान, मुनमुनने साकारलेले बबिता हे पात्र प्रेक्षकांना आजही प्रचंड आवडते.