नेवासा – जनता जनार्धनाच्या आशीर्वादामुळे व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणामुळे मी सतरा दिवसांत खासदार झालो. दुसऱ्यांदा पुन्हा या भागातील जनतेने खासदार केले. राजकारण न करता विकासात्मक कामे केली तर जनता जनार्धन ही पाठीशीच राहते. त्यामुळे येथून पुढील काळातही विकासात्मक कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील जैनपूर येथील १ कोटी ४९ लाख इतका निधी उपलब्ध करून कापरीनाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके यांनी केलेल्या मागणीनुसार खासदार लोखंडे यांनी सुमारे १० कोटी खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी वरील निधी उपलब्ध.करून केला. यावेळी ते बोलत होते.
जैनपूर येथील अंतर्गत रस्ते , जैनपूर शाळा खोल्यांचे भूमिपूजन भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, किसनराव गडाख उर्फ पेशवे अण्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जैनपूर येथील हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, जनार्धन जाधव, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे ,युवा नेते प्रशांत लोखंडे, ऋषिकेश शेटे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश डिके, संजय पवार ,शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब कांगुणे, महिला आघाडी प्रमुख मीराताई गुंजाळ, तालुका संपर्क प्रमुख बापूसाहेब दारकुंडे, विभाग प्रमुख अंबादास रोडे, शहर उपप्रमुख बंडूभाऊ शिंदे, काँग्रेसचे पांडे, जैनपूरच्या सरपंच शैला शिरसाठ, बेलपांढरीचे सरपंच साहेबराव गारुळे, घोगरगावच्या सरपंच विद्या बहिरट उपस्थित होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शिवसेना – भाजप युती सरकारमुळे विकासात्मक कामांना प्राधान्य मिळत असल्याने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असून विविध योजनांचा गोरगरीब लाभ घेत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडित कामे भविष्यात खासदार लोखंडे हे मार्गी लावतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविकात शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके यांनी कापरीनाला कामासाठी सतत पाठपुरावा केल्यानेहा निधी मिळाल्याचे सांगितले. खासदार लोखंडे यांचा जैनपूर, बेलपांढरी, बेलपिंपळगाव, घोगरगाव, सुरेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कापरी नाला कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बेलपांढरी गावचे सरपंच साहेबराव गारुळे यांनी आभार मानले.