काऱ्हाटी- लोणी भापकर (ता. बारामती) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून लोणी भापकर ग्रामपंचायत व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या माध्यमातून गाव परिसरातील सार्वजनिक ठिकाणावरील व व्यक्तिगत तसेच दुकानदार यांनी प्लॅस्टिक वापर करू नये, म्हणून शपथ घेऊन ठराव केला. परिसरातील दुकानात अथवा इतर ठिकाणी प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असून त्याचे फलक गावात दर्शनी ठिकाणी लावण्यात आले आहेत.
दरम्यान, येवेळी परिसरामधून सात गोण्या प्लॅस्टिक जमा करण्यात आले असल्याचे सरपंच विजय बारवकर, उपसरपंच संतोष खैरे, ग्रामसेवक आर. के. चांदगुडे यांनी सांगितले. याप्रसंगी सुदाम मदने, जयसिंग भापकर, मनीषा गोलांडे, संतोष चोपडे, निलेश गोलांडे, रवींद्र भापकर, गोविंद भापकर, गोविंद पवार, भीमराव पवार, डॉ. संजय पाटील, बापू काळाने, कांतीलाल मदने, शिवाजी कांबळे, शिवाजी भापकर, बाळासाहेब पवार, मुख्याध्यापक संदीप जगताप, बापू ठोंबरे, ताराचंद भापकर आदींनी सहभाग घेऊन गावापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातून सर्व स्तरातून याचे कौतुक करण्यात येत आहे.