पुणे: गेल्या आठवड्यात राज्यात विविध भागांत अतिवृष्टीचा तडाखा दिल्यानंतर थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आगमनाची चाहुल दिली आहे. दरम्यान, आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी नगर आणि स्वारगेट भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
कोथरुड मध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. कर्वे पुतळा चौक परिसरात दुचाकी वाहने निम्मी पाण्याखाली गेली आहेत.