पुणे – राज्यातील जिल्हा परिषदांच्या 300 शाळा “आदर्श शाळा’ म्हणून विकसित होणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 12 शाळांचा समावेश आहे. या निवडलेल्या आदर्श शाळा इयत्ता पहिली ते सातवी वर्गाच्या आहेत. गरज पडल्यास आठवीचे वर्ग त्याला जोडण्यास वाव असणार आहे.
या आदर्श शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबींचा समावेश असेल. भौतिक सुविधांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चांगल्या स्थितीतील वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडासाहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयांचा समावेश आणि दळणवळणाची साधने असावीत.
विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण, प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना त्यात वाचन, लेखन व गणिती क्रिया अवगत होणे अनिवार्य असणार आहे. शाळेच्या ग्रंथालयांमध्ये निरनिराळी गोष्टींची पूरक पुस्तके संदर्भ ग्रंथ असावेत असी संकल्पना आहे.