राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शासकीय नोकरीत असणार्या परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघाबाहेरील 122 अधिकारी कर्मचा-यांच्या करीता टपाली मतदान सुविधा राजगुरूनगर येथे केटीईएस इंग्लिश मेडीयम शाळेत व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.
खेड तालुक्यातील मतदान केंद्रावर जाणार्या कर्मचार्यांना आपले मतदान ईडीएसद्वारे मतदान केंद्रात करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 762 कर्मचारी मतदान करणार असल्याची माहिती सह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
शिरूर मतदारसंघाबाहेरील असणार्या राज्यभरातील विविध लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यातील गावांमध्ये मतदार असणारे; परंतु सध्या खेड तालुक्यात विविध शासकीय विभागात नोकरी करत असणा-या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या करीता निवडणूक आयोगाने संबंधित लोकसभा मतदारसंघातील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
खेड तालुक्यातील 122 अधिकारी कर्मचार्यांना टपाल मतदान करण्याची संधी उपलब्ध करुन देऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पहिल्यादांच अभिनव प्रयोग निवडणूक आयोगाने राबविल्याने राज्यभरातील शासकीय नोकरीनिमित्ताने विखुरलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांना आता मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे.
मतपत्रिका प्राप्त होऊन येत्या 10,11,12 तारखेला टपाली मतदान करण्यासाठी ज्यांनी नोंदणी केली त्यांच्यासाठी मतपत्रिका राजगुरुनगर येथे टपाली मतदान केंद्रात मतदानकक्ष उभारण्यात आला आहे. – दत्ता भारमळ, प्रमुख, टपाली मतदान पथक