मुंबई – बॉलीवूडमधील अनेक स्टारकिड्सच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. यात सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी यांचाही समावेश आहे. इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. याचे कारण म्हणजे अनेकदा यांना एकत्र पाहण्यात आल्याने हा अंदाज लावला जात आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.
नुकतेच इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी करण मेहताच्या बर्थडे पार्टीत सोबतच पोहोचले. यावेळी पलकने ब्लॅक वनपीस परिधान केला होता. तर इब्राहिमनेही ब्लॅक शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान केले होते. हे दोघेही एकाच गाडीतून एकत्र येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी अनेकदा दोघ एकत्र दिसले आहेत. मात्र अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. इब्राहिम आणि पलकप्रमाणे अनन्या पांडे आणि आर्यन खान, नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही अफेअरची सर्वत्र चर्चा आहे.
दरम्यान, पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून पदार्पण केले आहे. त्यानंतर आता इब्राहिम अली खानही लवकरच बोमन ईरानीचा मुलगा कोयोज ईरानीच्या ‘सरजमीन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.