सारा अली खान तिच्या अभिनय आणि क्युटनेसमुळे सातत्याने सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सारा बॉलीवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. सिंबा, केदारनाथ यांसारख्या सिनेमाच्या यशामूळे बॉलीवूडमध्ये ती सर्वाधिक लोकप्रिय आहे.
सोशल माध्यमांमध्ये ती नेहमीच अॅक्टिव्ह असून आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील भावनिक पोस्ट ती नेहमीच पोस्ट शेअर करत असते. यातच सारानं तिचे वडील सैफ अली खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यासोबत तिनं एक अट सुद्धा ठेवली आहे.
एका मुलाखतीत सारानं तिच्या फिल्मी करिअरविषयी दिलखुलास गप्पा मारल्या. तिने सांगितले,’ मला आशा आहे की तो दिवस लवकरच येईल आणि मी बाबांसोबत सिनेमात काम करेन. मात्र त्यासाठी माझी एकच अट आहे ती म्हणजे सिनेमाची स्क्रिप्ट चांगली असायला हवी. जेव्हा एखादा चांगला प्रोजेक्ट असेल तेव्हा आम्ही दोघं प्रेक्षकांना ऑनस्क्रीन नक्कीच एकत्र दिसू. त्यांच्यासोबत एका सिनेमात काम करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.