नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एनडीए सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा सुरू होती.
विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर मोदी उत्तर देत होते यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सुरुवातीपासूनच्या काळाचे वर्णन देखील केले. ‘हे इंडिया गटबंधन नसून घमंडीया गटबंधन आहे’ असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विरोधकांनी इंडियाचे (I N D I A ) तुकडे केले असं देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पंतप्रधान यावेळी काँग्रेसवर बोलत राहिले. पंतप्रधानांनी थेटपणे विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे न दिल्याने विरोधकांनी सभागृहात मणिपूरच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. मात्र, यावेळी मणिपूरच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,
‘मी मणिपूरच्या जनतेला सांगू इच्छितो की माता, भाऊ, बहिणी देश तुमच्यासोबत आहे. हे घर तुझ्यासोबत आहे. या आव्हानावर सर्व मिळून तोडगा काढू, असे ते म्हणाले. मणिपूर विकासाच्या मार्गावर पुढे जाईल. असं देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मणिपूरबाबत न्यायालयाचा निर्णय आल्याचे पीएम मोदींनी सांगितले. त्याच्या बाजूने आणि विरोधाची परिस्थिती काहीही असली तरी हिंसाचाराचा काळ सुरू झाला. यामध्ये अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागला, महिलांवर गंभीर गुन्हे घडले.
हा गुन्हा अक्षम्य आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहे. मी जनतेला खात्री देऊ इच्छितो की ज्या प्रकाशाने हे प्रयत्न सुरू आहेत, तो शांततेचा सूर्य नजीकच्या भविष्यात नक्कीच उगवेल. असं ते म्हणाले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (9 ऑगस्ट) लोकसभेत कोणतेही राजकारण न करता दोन तास मणिपूरबद्दल तपशीलवार माहिती दिली. सरकार आणि देशाची चिंता व्यक्त केली. यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यामध्ये मणिपूरच्या जनतेला विश्वासाचा संदेश देण्याचा सदनाचा प्रयत्न होता. देशाच्या भल्यासाठी आणि मणिपूरच्या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला, पण राजकारणाशिवाय त्यांना काहीही मिळाले नाही.