अहमदनगर : इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकानी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. मी तसं वक्तव्य केलेले नाही’ यूट्युबला आम्ही काही टाकत नाही, तसेच कार्यक्रमाची रेकॉर्डिंग देखील करत नाही.’ असा दावा इंदोरीकर महाराजांनी केला आहे.
“मी समाज प्रबोधनाचे काम करतो” मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. जानेवारी,फेब्रुवारीत माझे नगर जिल्ह्यात कीर्तन झाले नाही. ‘मी ते वाक्य बोललोच नाही”; असे उत्तर इंदोरीकर महाराजांनी नोटिशीत दिले आहे.
इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली होती. पुरोगामी संघटनांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. इंदोरीकर महाराजांवर काय कारवाई होणार? याची सर्वत्र चर्चा चालू आहे.
दुसरीकडे इंदोरीकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ते जर तसं बोलले नसतील तर त्यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी म्हटलं आहे. तसेच माध्यमांनी वक्तव्याचे पुरावे दिले तर पुराव्यांची तपासणी करून महाराजांवर योग्य ती कारवाई करू,अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
दरम्यान इंदोरीकर महाराजांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती मुलं रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात असे वक्तव केले होते. त्यावर त्यांना हि नोटीस बजावण्यात आली होती.