आळंदी – येथील क्रांतिपार्कमध्ये विविध सामाजिक सेवाभावी संस्थांच्या वतीने क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची 113 वी जयंती पुष्पहार अर्पण करीत अभिवादनाने साजरी करण्यात आली.
या जयंतीचे आयोजन कष्टकरी कामगार पंचायत, हुतात्मा राजगुरू सर्व मजूर संघ, आळंदी जनहित फाउंडेशन, भाईचारा फाउंडेशन, कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळाचे वतीने करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शिवसेनेचे चऱ्होली खुर्द शाखा प्रमुख हनुमंत थोरवे, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, संयोजक सुलतान शेख, सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त शिरीष कारेकर, पत्रकार महादेव पाखरे, अनिल जोगदंड, मनसे रस्ते साधन सुविधा आस्थापना शहराध्यक्ष किरण नरके, उद्योजक राजेंद्र धोका, मनोहर दिवाने, रमेश गव्हाने, संकेत वाघमारे, गोविंदा कु-हाडे, सुयोग कांबळे, मिलिंद पाटोळे, ज्ञानेश्वर बनसोडे, साहील रेनके यांचेसह विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सचिव सुलतान शेख यांनी सूत्रसंचालन केले, तर उद्योजक मनोहर दिवाने यांनी आभार मानले.