चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या

आरोपीला 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ः कोपरगाव तालुक्‍यातील वारी येथील घटना 

कोपरगाव – पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची घटना कोपरगाव तालुक्‍यातील वारी भरतवाडी येथे रविवारी (दि. 21) दुपारी घडली. मयत महिलेच्या भावाने सोमवारी रात्री उशिरा कोपरगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमोल मारुती बोर्डे याने रविवारी दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान राहत्या घरात पत्नी सविता अमोल बोर्डे (वय 27 ) हिच्या डोक्‍यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना तालुक्‍यातील वारी भरतवाडी परिसरातील खोलवाट वस्ती येथे घडली. मयत सविता बोर्डे हिच्यावर सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात अत्यंसंस्कार करण्यात आला.

त्यानंतर सविता बर्डे यांचा भाऊ भानुदास मल्हारी मोरे (रा. राजणगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हा फिर्याद देण्यास कोपरगाव ग्रामीण पोलिसांत हजर झाला व त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, गेल्या एक वर्षापासून माझे दाजी अमोल बोर्डे हे माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. माझी बहीण राहात असलेल्या गल्लीत शेजारच्या लोकांशी बोलताना आढळल्यास तू परपुरुषाशी कशाला बोलतेस तुझे त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे, असे म्हणून सतत मारहाण करीत होते. याच कारणावरून माझे दाजी व बहीण यांच्यात रविवारी दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणात दाजी अमोल यांनी माझ्या बहिणीच्या उजव्या कानाच्यावर डोक्‍यात, मानेवर व डाव्या हाताच्या मनगटावर कुऱ्हाडीने घाव घातले. घडलेल्या घटनेविषयी सविताचे भाया भास्कर मारुती बोर्डे यांना विचाले असता, त्यांनी झालेल्या सर्व घटनेविषयी मला माहिती दिली असे भानुदास मोरे यांनी म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी अमोल बोर्डे यांच्या विरोधात गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनास्थळी रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, उपनिरीक्षक आशिष शेळके, सचिन इंगळे यांनी भेट दिली आहे. मयत सविता बोर्डे व अमोल बोर्डे यांच्या लग्नास दहा वर्षे झाली असून, त्यांना महेश (वय 9), अनुजा (वय 8) वयाची दोन मुले आहेत. दरम्यान, आरोपी अमोल यास आज कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले असता, न्यायालयाने बोर्डे यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)