गोंडा, (उत्तर प्रदेश): माहेरी गेलेली पत्नी लॉकडाऊनमुळे परत येऊ न शकल्याने एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यामध्ये घडली आहे. बुधवारी गोंडा जिल्ह्यातील राधाकुंड परिसरात ही घटना घडली. राकेश सोनी (वय 32) असे मृताचे नाव आहे.
माहितीनुसार, सोनीची पत्नी तिच्या पालकांच्या ठिकाणी गेली होती आणि लॉकडाऊनमुळे तेथे अडकली होती. सोनी याला पत्नीची फार आठवण येऊ लागली. म्हणून त्याने आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.