ब्रुसेल्स (बल्गेरिया) – हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओरबान यांनी युक्रेनसाठीची ५० अब्ज युरो (५४ अब्ज डॉलर)ची मदत रोखली आहे. युरोपीय संघाकडून प्राप्त झालेला हा निधी गोठवण्यात आला आहे. युरोपीय संघाच्या निदीचा वापर आपल्या निवडणूक लाभासाठी करण्याचा ओरबान यांचा इतिहास आहे. त्यांनी युक्रेनसाठीचा निधी रोखल्यामुळे युक्रेनला तातडीने हवी असलेली मदत मात्र मिळू शकणार नाही. मात्र युरोपीय संघाचे सदस्यत्व मिळण्याच्या प्रक्रीयेवर त्याचा परिणाम होणार नाही.
युक्रेन आणि माल्दोवा या देशांना युरोपीय संघाचे सदस्यत्व देण्याच्या मुद्यावर युरोपीय संघाची जानेवारीमध्ये पुन्हा बैठक होणार आहे. या दोन्ही देशांना सदस्यत्व देण्यावर विचार करायला सदस्य देशांनी सहमती दर्शवली आहे. युक्रेनसाठी ही एक मोठी चांगली बातमी आहे. असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी म्हटले आहे.
त्यांनी युरोपीय संघाच्या सदस्य देसांचे आभारही मानले आहेत. युरोपीय संघाचे सदस्यत्व युक्रेनला मिळण्याची प्रक्रीया अखेरीस सुरू झाली आहे, स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करतान जे थकलेले नाहीत, त्यांच्यासाठी हा विजय असल्याचे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे.
युक्रेनला युरोपीय संघाचे सदस्यत्व मिळण्यासाठीचा आपला विरोध यापुढेही कायम असेल. हा निर्णय सामुहिक एकमताने घेण्यात यावा, अशी आपली आग्रहाची मागणी असल्याचे ओरबान यांनी म्हटले आहे.
हा निर्णय म्हणजे युरोपाच्या नागरिकांसाठी आणि खंडासाठी सकारात्मक निर्णय असल्याचे युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी म्हटले आहे. दरम्यान मोल्दोवाला युरोपीय संगाचे सदस्यत्व देण्याबाबत विचार करायची तयारी सर्व सदस्य देशांनी दाखवल्याबद्दल मोल्दोवाने आनंद व्यक्त केला आहे.