हुवावेचा तिढा आणि मोबाइलधारक (भाग-१)

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचे पडसाद आता सामान्य ग्राहकांवर पडणार असे दिसते आहे. चिनी व्यापाराविरोधात अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांची झळ जगातील सर्वांत मोठी मोबाइल निर्माती कंपनी हुवावेला लागली आहे. अमेरिकेने सध्या या चिनी कंपनीवर लावलेल्या निर्बंधांना 90 दिवसांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक समस्या निर्माण होणे रोखण्यासाठी काही अवधी द्यायला हवा असा त्यामागचा दृष्टिकोन आहे. अर्थात या मुदतीचा निर्बंधाच्या निर्णयावर काहीही परिणाम होणार नाही.

हुवावेचा तिढा आणि मोबाइलधारक (भाग-२)

गेल्या आठवड्यातच अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून हुवावे कंपनीला एनटीटी यादीमध्ये सामील केले आहे. या यादीतील कंपन्यांना विना परवाना अमेरिकेतील कंपन्यांबरोबर व्यापार करता येणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हुवावे कंपनीच्या उपकरणांद्वारे चीन अमेरिकेत गुप्तहेरी करत असल्याचा आरोप अमेरिका करते आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने त्यांच्या सहकारी देशांनाही हुवावेचा बहिष्कार कऱण्याचे आवाहन केले होते. अमेरिकेच्या सांगण्यावरूनच गेल्या वर्षी हुवावे कंपनीचे सीएफओ मेंग वांगझू यांना कॅनडामध्ये अटकही करण्यात आली होती. हुवावे कंपनीवर निर्बंध लावण्याच्या निर्णयानंतर चीनने आपल्या कंपन्यांचे हित आणि अधिकारांची सुरक्षा करण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलली जातील, असे सांगितले. हुवावे कंपनीवर निर्बंध लादल्यानंतर गुगल या अमेरिकन कंपनीने त्यांच्याबरोबरची आपली भागीदारी संपवण्याची घोषणा केली. त्यामुळे हुवावे ऍन्ड्रॉईडची अपडेट मिळणार नाही म्हणजेच हुवावे स्मार्टफोनमध्ये आता गुगल प्ले स्टोअर, जीमेल आणि युट्यूब सारख्या ऍप्स ची सेवा बंद होतील.

– अपर्णा देवकर

Leave A Reply

Your email address will not be published.