मित्रपक्ष महाआघाडीची संयुक्त बैठक मुंबईत संपन्न; पराभवाचे केले चिंतन

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष महाआघाडीच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आघाडीची चिंतन बैठक आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे वर इतर नेते उपस्थित होते.

नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने महाआघाडीचा जोरदार पराभव केला. एकट्या भाजपने स्वबळावर ३०३ जागा जिंकल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३५२ जागांवर विजय संपादन केला. भाजपने काँग्रेसचा सुपडा साफ केल्याचे चित्र सध्या देशात आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)