बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद हे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या “वॉर’नंतर पुन्हा एकदा एकत्रित आले आहे. ही जोडी आणखी एक ऍक्शन ड्रामा साकारण्यासाठी ऑन-स्क्रीन पार्टनर होण्यास सज्ज झाली आहे.
एका मुलाखतीत सिद्धार्थ आनंदने हृतिक रोशनसोबत चित्रपट करणार असल्याचे सांगितले आहे. सिद्धार्थ आनंद म्हणाला, हृतिक रोशन हा परिपूर्ण अभिनेता आहे. खरंच, एखाद्या दिग्दर्शकाला जे हवं आहे, ते देण्यात अभिनेता हृतिक तयार असतो. मला असे वाटते की, सेटवर प्रत्येक तासाला त्यांच्या क्षमतेचा उपयोग करून काहीतरी नवीन घेऊन यावे लागते.
त्याच्यासोबत राहणे खरोखरच रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. हृतिक रोशनसोबत चित्रपट साकारल्यानंतर चित्रपट निर्मात्याला त्याच्यासोबत वारंवार काम करण्याची इच्छा होते.
मी फक्त त्यांच्यासोबत काम करू शकतो किंवा त्यांच्याद्वारे माझ्या कल्पना मांडू शकतो, असे सिद्धार्थ आनंदने सांगितले. दुसरीकडे फायटरमध्ये सिद्धार्थसोबत पुन्हा काम करण्याबद्दल हृतिक रोशन म्हणाला, होय हे खूप रोमांचक आहे.
कारण मला अशा सेटवर परत आल्यासारखे वाटत आहे जिथे सिडने (सिद्धार्थ आनंद) मला दाखवलेल्या युद्धात एक चांगला लूक दिला आहे. दरम्यान, भारतातील पहिल्या एरियल ऍक्शन फ्रॅंचाईजी “फायटर’मध्ये हृतिक रोशन प्रथमच दीपिका पादुकोणसह झळकणार आहे. यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.