हृतिक रोशनच्या “वॉर’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यापूर्वीच्या “सुपर 30′ ने तर प्रेक्षकांच्याबरोबर विश्लेषकांकडूनही कौतुक मिळवले होते. दोन भिन्न व्यक्ति -रेखांना हृतिकने मस्त न्याय दिल्याची प्रतिक्रिया त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.
आता हृतिक एका बिग बजेट सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे “बाहुबली’ प्रभास प्रथमच त्याच्या बरोबर या सिनेमामध्ये दिसणार आहे.
“बाहुबली’ आणि “बाहुबली 2’मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रभाससाठीही ही एक अनोखी संधी असणार आहे. या सिनेमासाठी प्रभासने या सिनेमासाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते आहे. तर हृतिकबरोबर चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्याच्याकडून्न होकार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सिनेमाची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.
अजय देवगणच्या “तानाजी’चे दिग्दर्शन करणाऱ्या ओम राउत यांच्यावरच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी
असणार आहे. प्रभासचा “साहो’ बॉक्स ऑफिसवर विशेष प्रभाव दाखवू शकला नव्हता. आता प्रभास आणखी एका सिनेमातही दिसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे “वॉर’ आणि “सुपर 30′ नंतर हृतिक रोशनने दीपिका पादुकोणबरोबर एक डॉक्युमेंटरी केली होती.