सातारा – जिल्ह्यातील ४६ जणांचा करोना रिपोर्ट करोना पाँझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळी दिली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १४१८ झाली आहे. तसेच तीन करोनाबाधितांचा म्रुत्यू झाला आहे.मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यांमधील निकट सहवासातील ३९, प्रवास करुन आलेले ४, सारीचे व आयएलआय ३ अशा एकूण ४६ नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे. तसेच जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील ३५ वर्षीय, पुनवडी येथील ६० वर्षीय व पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील ६४ वर्षीय पुरुष या तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या ४६ करोना बाधितांमध्ये पाटण तालुक्यातील गोकुळ येथील 2२९ वर्षीय महिला, कोयनानगर येथील ४५, ४८, ६० वर्षीय पुरुष, कामरगाव येथील ४० वर्षीय पुरुष, दबाचमल येथील १४ वर्षीय युवक, कडवे बुद्रुक येथील ३५ वर्षीय पुरुष, सदादाढोली येथील ८५ वर्षीय महिला,
माण तालुक्यातील म्हसवड येथील ५३ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, १६ वर्षीय युवती, दोरगेवाडी येथील २२, ५५ वर्षीय महिला व १३ व १९ वर्षी युवती, ४० वर्षीय पुरुष, इंजबाव येथील २८ वर्षीय पुरुष, मार्डी येथील ४२ वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुक येथील ४० वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिला,
कराड तालुक्यातील तारुख येथील ४८ वर्षीय पुरुष, कोटीवले येथील ३६ वर्षीय महिला, तारुख येथील २६ वर्षीय महिला, शामगाव येथील ४९ वर्षीय पुरुष, सुपने येथील २८ वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील जिहे येथील ७ वर्षाचा बालक, खावली येथील ५२ वर्षीय पुरुष, जिहे येथील ५० वर्षीय पुरुष, ७० व ८५ वर्षीय महिला, भरतगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील ३४ वर्षीय पुरुष, कण्हेर येथील ३२ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर, सातारा येथील ४५ वर्षीय पुरुष,
वाई तालुक्यातील केंजळ येथील २३, ४८, २७ वर्षीय पुरुष व ४८, ७०, ३०, २५ वर्षीय महिला, पसरणी येथील ३० व ५२, ४४ वर्षीय महिला
जावळी तालुक्यातील पुनवडी येथील ६० वर्षीय पुरुष, कास येथील ३८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
तीन बाधिताचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील ३५ वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पाटण तालुक्यातील शितापवाडी येथील ६४ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच जावळी तालुक्यातील पुनवडी येथील ६० वर्षीय पुरुषाला उपचाराकरिता क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यु झाला. उपचारादरम्यान घेण्यात आलेला नमुना करोनाबाधित आला आहे. तसेच खासगी प्रयोग शाळेत तपासणी करुन करोनाबाधित असलेला २८ वर्षीय पुरुष काल रात्री उशिरा मुंबई येथून प्रवास करुन क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात य दाखल झाला आहे.