नवी दिल्ली – सध्याच्या जागतिक महासंकटाने शिकण्यात अडथळे निर्माण केले आहेत, विशेषत: लहान मुलांसाठी. पायाभूती सुविधा किंवा स्रोतांचा तुटवडा असल्याने पूर्णपणे ई-लर्निंगचा अवलंब करू न शकलेल्या शाळांमधील मुलांवर याचा अधिक परिणाम झाला आहे. भारतासारख्या देशात जिथे पालक अनुभवात्मक शिक्षणाच्या लाभांना महत्त्व देतात अशा ठिकाणी याचे महत्त्व अधिक आहे. संगणक क्षेत्रातील विख्यात एचपीच्या न्यू एशिया लर्निंग एक्स्पिरिअन्स अभ्यासानुसार डिजिटल शिक्षणपद्धतीमुळे मुलांचा लक्ष देण्याचा कालावधी सुधारला आहे आणि अनुभवात्मक शिक्षणामुळे मुलांचा वाचनाचा कालावधीही वाढल्याचे लक्षात आले आहे.
त्याचा विचार करुनच, एचपी इंडियाने त्यांचे प्रिंट लर्न सेंटर सादर केले असून यामुळे भारतातील लाखो मुलांना घरून शिकण्यात विनामूल्य सहाय्य लाभणार आहे. प्रिंट लर्न सेंटर म्हणजे 3 ते 12 या वयोगटातील मुलांना शिकण्याचा परिपूर्ण अनुभव मिळावा या उद्देशाने बालशिक्षण तज्ज्ञांनी तयार केलेल्या, वैज्ञानिकरित्या तयार केलेल्या प्रिंट करता येण्याजोग्या लर्निंग मॉड्युल्सचा संच आहे. http://www.printlearncenter.com/ या खास तयार करण्यात आलेल्या वेबसाइटच्या माध्यमातून मोफत डाऊनलोड आणि प्रिंट करता येईल, असा लर्निंग कंटेंट उपलब्ध होतो.
एचपीने “अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’च्या मार्गदर्शनाखाली हे मॉड्युल कंटेंट्स तयार केले आहेत. देशभरातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एचपी हा कंटेंट मराठीसह इंग्रजी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि गुजराती या आठ भाषांमध्ये उपलब्ध करून देत आहे. या कंटेंटमध्ये सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी काही मजेशीर उपक्रमांचाही समावेश आहे. वयोगटानुसार असलेला हा कंटेंट घरबसल्या आरामात डाऊनलोड किंवा प्रिंट करता येऊ शकतो. मुलांसाठी शिकणं अधिक छान व्हावं यासाठी हा कंटेंट वर्कशीट्स, रंगीत पाने, कोडी आणि छपाईयोग्य इतर माध्यमांचा (other learning pintables) वापर करून तयार करण्यात आला आहे.
“सोशल डिस्टन्सिंग नियमांमुळे भारतातील लाखो मुलांना घरातूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. पारंपरिक शैक्षणिक वातावरणाचा अभाव असल्याने पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षण आणि प्रगतीसाठी सुरक्षित मार्ग धुंडाळणे काहीसे अवघड झाले आहे. “प्रिंट लर्न सेंटर हा शिक्षणतज्ज्ञांनी डिझाइन केलेला आकर्षक, गुंतवून ठेवणारा आणि सर्वसमावेशक असा कंटेंट पुरवून पालक आणि विद्यार्थ्यांना साह्य करण्याचा एक प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना नवे, अधिक रंजक मॉड्युल्स अभ्यासास मिळावेत यासाठी दर दिवसांनी नवे मॉड्युल्स सादर केले जाणार आहेत.
काय आहेत लाभ?
1. 30 दिवसांच्या शैक्षणिक वेळापत्रकाच्या माध्यमातून शिक्षणात नाविन्य
2. शाळेतून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणात यामुळे भर पडेल.
3. ही मॉड्युल्स घरातून शिकण्याला साह्य करतात
4. शारीरिक आरोग्य आणि मोटर डेव्हलपमेंट, भाषा आणि आकलन क्षमता, स्टेम क्षमता, क्रिटिकल थिंकिंग, सामाजिक आणि भावनिक विकास, संवेदना आणि ज्ञानेंद्रियात्मक प्रगती
5. सर्जनशील आणि कलासक्त जाणीवांची प्रगती अशा विविध निकषांवरील प्रगतीला चालना