Aadhaar Card Photo – बहुतांश लोकांचे फोटो आधार कार्डवर व्यवस्थित प्रिंट होत नाहीत. म्हणून अनेक लोक आपले आधार कार्ड दाखवण्यासाठी मनात संकोच बाळगतात. जर तुमचाही फोटो आधारकार्डवर व्यवस्थित प्रिंट झालेला नसेल तर तो बदलून घ्या. दोन प्रकारे तुम्ही आधार कार्डवरील फोटो बदलू शकता.
पहिला प्रकार – जवळच्या आधार केंद्रावर जाऊन फोटो बदला.
- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट उघडा.
- Get Aadhaar मध्ये आधार नामांकन/अपडेट फाॅर्म डाऊनलोड करा.
- फाॅर्म व्यवस्थित भरल्यानंतर आधार केंद्रावर जाऊन जमा करा.
- तेथे बायोमेट्रिक घेतले जाईल. फोटो, फिंगरप्रिंट, रेटिना स्कॅन झाल्यानंतर तुमचे आधार डिटेल्स अपडेट होईल.
दुसरा प्रकार – पोस्टाच्या माध्यमातून बदला फोटो
- सर्वात आधी UIDAI पोर्टलवर Aadhaar Card Update Correction फाॅर्म डाऊनलोड करून सर्व माहिती भरा.
- UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहा.
- पत्रासोबत फोटोमागे सही करून फोटो फाॅर्मसोबत जोडा.
- फाॅर्म आणि पत्र दोन्ही UIDAI च्या कार्यालयाचा पत्ता लिहून पोस्ट करा.
- दोन आठवड्यात नवीन फोटोसह तुम्हाला तुमचे आधारकार्ड मिळेल.