सातारा : दोन ‘महत्वपूर्ण’ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे-अजित पवार यांच्यात भेट; तर्कवितर्कांना उधाण

सातारा ( प्रतिनिधी ) – भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांच्या संदर्भात ही भेट घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले असले तरी या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बारामती येथील व्हीआयआयटी येथे सकाळी शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवार यांच्यात 15 मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली. भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील कामांसाठी ही भेट घेतल्याचे सांगत माध्यमांना टाळले.

मात्र, आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेची आणि सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.

शिवेंद्रसिंहराजे-अजित पवार यांच्यातील ही तिसरी भेट होती. यापूर्वीही शिवेंद्रसिंहराजे यांनी पुणे, मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमधील जवळीक वाढू लागल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.