Lok Sabha Election 2024 । केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. देशात लोकसभा सात टप्प्यांत, तर राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात, तर पुणे, मावळ आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका पार पाडणार आहेत. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि. 12 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे,
तर मतदान दि. 7 मे रोजी होणार आहे. पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 18 एप्रिलपासून सुरुवात होणार असून, मतदान दि.13 मे रोजी होणार आहे. या चारही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ
-उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – दि. 12 एप्रिल 2024
-अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – दि. 19 एप्रिल
-उमेदवारी अर्जांची छाननी – दि. 20 एप्रिल
-अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – दि. 22 एप्रिल
-मतदान – दि. 7 मे 2024
-मतमोजणी – दि. 4 जून 2024
हे वाचाल का ? राज ठाकरे म्हणाले,’अघोरी राजकारणाला वठणीवर आणाच…’ युजर्स म्हणाला, ’48 उमेदवार उभे करण्याची तुमच्यात ताकद…’