कैरो (इजिप्त) : मध्य पुर्वेत तब्बल 30 वर्ष शांतता प्रस्थापित करणारा नेता अशी ओळख असणारे नेते होस्नी मुबारक यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
मुबारक सत्तेवर असताना त्यांनी इजिप्तचे अमेरिकेशी असणारे संबंध सुधारले होते. त्यांनी इस्रायलशी शांतता करार केला. इजिप्तभूमीवरून दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन केले. मात्र 2011 मध्ये लाखो इजिप्तीशीयन तरूणांनी रस्त्यावर उतरत त्यांच्या सत्तेला आव्हान दिले. त्यानंतर लष्कराने बंड करत होस्नी मुबारक यांना पदच्यूत केले. मुबारक यांना पदच्यूत केल्यानंतर अरब जगताचा विकासाभीमूख चेहरा लोप पावला, अशी भावना व्यक्त होऊ लागली.
त्यांच्या विरोधात कैरोतील तहरीर चौकात झालेल्या निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर आणि त्यांच्या सुरक्षा प्रमुखावर 900 आंदोलकांची हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यात त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी केलेल्या अपिलात त्यांना 2014मध्ये मुक्त करण्यात आले होते. या निर्णयामुळे न्यायालयावर जनतेने रोष व्यक्त केला होता.