होशंगाबाद – मध्ये प्रदेशात करोना संसर्गाने कहर माजवला आहे. त्यातच येथे ज्युनियर डॉक्टरांनी संप पुकारला आहे. अशा स्थितीतही काही डॉक्टर देवदुताची भूमिका बजावत आहेत. येतील एका डॉक्टरने खासगी रुग्णालयातील लाखो रुपयांची नोकरी सोडून कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
होशंगाबाद जिल्ह्यात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे एमरजेन्सी वॉर्डला कुलुप लागले आहे. जिल्ह्यातील स्थिती बिकट आहे. या स्थितीकडे पाहात खासदार उदय प्रताप सिंह यांनी पत्र लिहून डॉ. ऋषी जॉर्ज यांना पत्र लिहून सरकारी रुग्णालयात सेवा देण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. ऋषी यांनी क्षणाचाही विलंब न करता लाखो रुपयांची नोकरी सोडून सरकारी रुग्णालय गाठलं.
या संदर्भात डॉ. ऋषी यांनी सांगितलं की, जिल्ह्यातील रुग्णांची गंभीर स्थिती पाहता, पीडित रुग्णांना मोफत सेवा देऊन करोना महामारीचा अंत होईपर्यंत लढा देण्याचं आपण ठरवलं आहे. डॉ. ऋषी यांचं कुटुंब केरळ राज्यातील कोचि शहरात वास्तव्यास आहे. मात्र तरी देखील डॉ. ऋषी यांनी आपल्या जन्मभूमीत येऊन रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.