आजचे भविष्य (सोमवार, दि.२३ नोव्हेंबर २०२०)

मेष : घरात आनंद देणारी तरुणांचा उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पोषक वातावरण मिळेल.

वृषभ : व्यवसायात सहज मोठ्या वाटणाऱ्या कामात अडथळे येतील. परंतु निराश न होता यश संपादन कराल.

मिथुन : नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करा. भावनेच्या भरात उधान उसनवारी टाळावी.

कर्क : नोकरीत नवीन कामाची संधी. कल्पकता दाखवून कामे उरकाल. विद्यार्थ्यांनी सबुरीचे धोरण ठेवावे.

सिंह : सामूहिक क्षेत्रात चांगली कामगिरी घडेल. प्रकृतीमान सुधारेल. महिलांना परोपकाराची संधी.

कन्या : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरदार व्यक्‍तिंना केलेल्या कामात समाधान मिळेल.

तूळ : कामानिमित्ताने प्रवास योग. घरात शुभ कार्य ठरतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता टिकवावी.

वृश्‍चिक : कामात प्रगतीचे मार्ग खुले होतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. प्रकृतीमान सुधारेल.

धनु : घराज सहजीवनाचा आनंद घ्याल. मुलांच्यासाठी पैसे खर्च कराल. मानसिक समाधान राहील.

मकर : महिलांनी अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवावे. कामाची विभागणी करून देखरेख करावी.

कुंभ : कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्‍तिंना नाव कमविता येईल.

मीन : शुभवार्ता कळेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.