नवी दिल्ली – हैद्राबाद मुक्ति दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, टीआरएस नेते गोसुला श्रीनिवास यांनी आपली कार गृहमंत्र्यांच्या ताफ्यासमोर उभी केली. काही वेळातच सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांना त्यांची गाडी काढण्यास भाग पाडले, यावेळी मोठी बाचाबाची झाल्याचे समोर आले.
टीआरएस नेते गोसुला श्रीनिवास यांनी कारवाईनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की मी चुकून तिथे आलो होतो पण मला काही समजेल तोच गृहमंत्र्यांच्या सुरक्षा दलानी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. माझ्या गाडीची तोडफोड झाली असल्याने याबाबत मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे गोसुला यांनी सांगितले.
13 दिवसांत अमित शाह यांच्या सुरक्षेत चूक होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाला होता. विशेष म्हणजे, हैदराबाद मुक्ति दिनात सहभागी होण्यासाठी गृहमंत्री अमित शाह तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एका कार्यक्रमात त्यांनी टीआरएस प्रमुख केसीआर यांच्यावरही अनेक हल्ले केले.