मुंबई – होळीचा सण म्हणजे आनंद आणि विविध रंगाची उधळण. त्यामुळे होळीचा हा सण सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असतो. दरम्यान, यावेळी पुरणपोळी, थंडाई यामुळे या सणात खाण्यापिण्याचीही मस्त चंगळ असते. होळीसाठी मित्रमंडळी, नातेवाईकमंडळी एकत्र येऊन तुफान धमाल करतात.
मग कलाकार मंडळी आणि कलाविश्वही त्यापासून दूर राहात नाही. सर्वच कलाकार मंडळी यावेळी रंगात अक्षरश: नाहून निघतात. अर्थात हा आनंद द्विगुणित करण्यासाठी बॉलिवूडमधील काही खास गाणी देखील तितकीच महत्वाची ठरतात. ती गाणी म्हणजे…
अंग से अंग ना… / चित्रपट- डर
होली खेले रघुवीरा / चित्रपट- बागबान
रंग बरसे / चित्रपट- सिलसिला
लेट्स प्ले होली / चित्रपट- वक्त
बलम पिचकारी / चित्रपट- ये जवानी है दिवानी
होली के दिन.. दिल खील जाते है / चित्रपट- शोले