काश्मीर आणि लडाखच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. काश्मीर-लडाखच्या काही भागात भूकंपामुळे जमीन हादरली. हे धक्के दुपारी 12.20 वाजता जाणवले. या भागात 4.2 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. काल जपानमध्ये झालेल्या भूकंपाच्या दुसऱयाच दिवशी लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे जाणवले आहेत.
भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-वायव्येस 160 किमी अंतरावर होता. तर त्याची खोली जमिनीच्या खाली 85 किमी होती. तत्पूर्वी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री 9.40 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रताही 4.2 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू श्रीनगरपासून 119 किमी उत्तरेस असल्याचे सांगण्यात आले. भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.