नवी दिल्ली – आशियाई हॉकी महासंघाने प्रशिक्षक व तांत्रिक अधिकारी तसेच काही माजी खेळाडू यांच्यासाठी या महिनाअखेरीस एक वर्कशॉप आयोजित केले आहे. यात आशिया खंडातील देशांचे एकूण 15 प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह विविध देशांचे रेफ्री व तांत्रिक अधिकारीही यात सहभागी होत आहेत.
करोनाचा धोका वाढल्यानंतर जगभरातील स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. काही देशांमध्ये हा धोका कमी असल्याने तिथे स्पर्धा आयोजित करणे शक्य असल्याचे मत महासंघाने व्यक्त केले होते.
या प्रशिक्षक व तांत्रिक अधिकारी वर्गाला करोनामुळे तयार करण्यात आलेल्या नव्या नियमांची तसेच काही सूचनांची सविस्तर माहिती व्हावी यासाठी हे वर्कशॉप आयोजित केल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.