नांदूर – सहजपूर (ता. दौंड) येथील औद्योगिक पट्टयात पुन्हा करोनाबाधित रुग्ण सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात एका नामांकित कंपनीमुळे करोना रुग्णांची वाढ होत आसल्याचे दिसत आहे. या टापूत प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आल्यामुळे एका नामांकित कंपन्याचे कामकाज उत्पादन बंद होते. मात्र, शनिवार (दि.1) पासून कामकाज जोमाने सुरू झाले आहे. येथील ये-जा करणारे कामगार हे दोन्ही गावांमधून येत असल्याने आज सहजपूर करोनाच्या रडारवर आले आहे. बाधित सापडल्यामुळे नांदूर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.