मुंबई – छोट्या पडद्या सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. यात तिने साकारलेल्या सुनेच्या भूमिकेला लोकांच्या प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर ती सध्या मीडियाच्या चर्चेत असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने इनस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहे. मात्र यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोल केले जात आहे.
एका कार्यक्रमात हिनाने हजेरी लावली होती. यावेळी तिने केलेल्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिनाने लाल रंगाचा नेटचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस ट्रान्सपरंट असून यात ती अधिच बोल्ड दिसत आहे.
View this post on Instagram
यावरून नेटकऱ्यांनी ‘रमजानच्या महिन्यात असे कपडे घातले आहेस, अल्लाह तुला कधीच माफ करणार नाही’, उमराहला गेल्याचा काहीच फायदा नाही’, ‘लाज बाळग, आताच उमराह करून आलीस’ असे म्हंटले आहे. तर काहींनी लिहिले की, “उमराह नंतरची परिस्थिती सारखीच आहे”, “सर्व सेलिब्रिटी सारखेच आहेत”, असे म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रमजानच्या पवित्र महिन्यात उमराह करण्यासाठी हिना सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे गेली होती. उमराह यात्रा पूर्ण केल्यानंतर हिनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जांभळ्या रंगाच्या बुरख्यात दिसत होती. मात्र याठिकाणी जाऊन पोझ दिल्यानेही हिनाला ट्रोल करण्यात आले होते.